५८ वर्षीय गंभीर रुग्णावर म्यूकरची यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST2021-06-02T04:13:38+5:302021-06-02T04:13:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोस्ट कोविड म्यूकरच्या एका ५८ वर्षीय प्रकृती गंभीर असलेल्या ...

Successful mucosal surgery on a critically ill 58-year-old patient | ५८ वर्षीय गंभीर रुग्णावर म्यूकरची यशस्वी शस्त्रक्रिया

५८ वर्षीय गंभीर रुग्णावर म्यूकरची यशस्वी शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोस्ट कोविड म्यूकरच्या एका ५८ वर्षीय प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णावर जबड्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. १८ जणांच्या वैद्यकीय पथकाने चार तासात ही शस्त्रक्रिया करून रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

जीएमसीत आतापर्यंत म्यूकरच्या तीन शस्त्रक्रिया झाल्या असून या आधीचे दोन रुग्णांना कोविडची बाधाही होती. त्यानंतर नंदूरबार येथील ५८ वर्षीय रुग्ण हे कोविडमधून बरे झालेले होते. त्यानंतर त्यांना म्यूकरमायकोसिसची लागण झाली होती. यात त्यांच्या जबड्यापर्यंत ही बुरशी गेल्याने त्यांना तीन दिवस एम्फोटेरेसीन बी हे इंजेक्शन दिल्यानंतर अखेर मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी ९.३० ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया सुरू होती. यात शल्यचिकित्सा शास्त्रविभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. विजय गायकवाड, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. अक्षय सरोदे, दंतशल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, भूलतज्ञ डॉ. संदीप पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रुग्णाचे कोविडनंतर फुफ्फुसे प्रभावीत झाली होती. त्यामुळे या रुग्णालया श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. ऑक्सिजनची गरज लागत होती. थोडी कठीण व गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया होती. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

तीन रुग्ण पुन्हा वाढले

म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून जीएमसीत दाखल रुग्णांची संख्या ही ३१ वर पोहोचली आहे. त्यात सीटू कक्षात २० रुग्ण तर आयसीयूमध्ये ५ आणि ७ क्रमांकाच्या कक्षात ६ रुग्ण दाखल आहेत.

Web Title: Successful mucosal surgery on a critically ill 58-year-old patient