वरद गुरवचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:36+5:302021-09-04T04:21:36+5:30

जळगाव - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा विशारद परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात वरद मनोज गुरव हा विशारद ...

Success of Varad Guru | वरद गुरवचे यश

वरद गुरवचे यश

जळगाव - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा विशारद परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात वरद मनोज गुरव हा विशारद पूर्ण 'तबला' या विषयात उत्तीर्ण झाला असून त्याला विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयाचे संगीत शिक्षक रवींद्र भोईटे व शरद दांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

००००००००००००

उपोषणकर्त्या महिलेविरोधात तक्रार

जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील प्रतिभा परदेशी या महिलेचे आरोप आणि उपोषणही तथ्यहीन असल्याचा दावा करीत शुक्रवारी त्या महिलेविरोधातील डांभुर्णीच्या उपसरपंच, पोलीस पाटलांनी निवासी जिल्हाधिका-यांकडे तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान, चार दिवसापासूनच्या उपोषनामुळे या महिलेला उपचारांची गरज असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिका-यांनी दिला आहे.

००००००००

कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल

जळगाव - मालवाहतूक रिक्षाला मागून भरधाव येणा-या कारने धडक दिली होती. यात रिक्षाचालक भरत उखा ढाकणे (रा.मालदाभाडी, ता.जामनेर) यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ६ वाजता चिंचोली-उमाळा दरम्यान घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी एमएच.१९.एपी.४६९६ क्रमांकाच्या कार चालकाविरूध्द सुनील अभिमन्यू शार्दुल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Success of Varad Guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.