सीबीएसई परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:58+5:302021-08-01T04:16:58+5:30

------------- हिरालाल सोनवणे सेवानिवृत्त जळगाव : शहरातील हिरालाल अशोक सोनवणे हे भारतीय भूदल सेनेमधून १८ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. ...

Success in CBSE exam | सीबीएसई परीक्षेत यश

सीबीएसई परीक्षेत यश

-------------

हिरालाल सोनवणे सेवानिवृत्त

जळगाव : शहरातील हिरालाल अशोक सोनवणे हे भारतीय भूदल सेनेमधून १८ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा मिरवणूक सोहळा व कौतुक समारंभ १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.

---------------

लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

जळगाव -किलबिल बालक मंदिरात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सोहम माळी या विद्यार्थ्याने लोकमान्य टिळकांची वेशभूषा साकारली होती. याप्रसंगी चंद्रकांत भंडारी, मंजूषा चौधरी, अर्चना नेमाडे, कुंदा भारंबे, रत्नप्रभा नेमाडे आदींची उपस्थिती होती.

--------------

स्मशानभूमीत बाकांची व्यवस्था

जळगाव : चिंचोली येथे स्मशानभूमीत येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होत असे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांची ही गैरसोय टळावी यासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सतर्फे बाके बसविण्यात आली. यावेळी गावाचे सरपंच, क्लब अध्यक्ष नीरज अग्रवाल, सचिव विपुल पटेल, सागर मुंदडा, धनराज कासट, राहुल कुकरेजा, चेतन सोनी, हर्षल कटारिया, निकुंज बियाणी, भरत मंधान, चिराग शहा, पुनीत भल्ला, मनोज घुगे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

-------------

शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव - राज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शंतनू अग्रवाल, अमृत मित्तल, धीरज फटागळे, गुणवंत नारखेडे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पी.डी. नेहते यांनी केले, तर आभार के.डी.बऱ्हाटे यांनी मानले.

Web Title: Success in CBSE exam