आग्रा येथून बेपत्ता झालेली महिला पोलिसांमुळे सुखरूप

By Admin | Updated: July 3, 2017 12:04 IST2017-07-03T12:04:24+5:302017-07-03T12:04:24+5:30

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून बेपत्ता झालेली नीलम नरेंद्र कश्यप ही महिला येथील लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांर्पयत सुखरूप पोहचली.

Succesfully rescued by women police from Agra | आग्रा येथून बेपत्ता झालेली महिला पोलिसांमुळे सुखरूप

आग्रा येथून बेपत्ता झालेली महिला पोलिसांमुळे सुखरूप

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.3 - उत्तर प्रदेशातील आग्रा येथून बेपत्ता झालेली नीलम नरेंद्र कश्यप ही महिला येथील लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुरक्षितपणे  तिच्या कुटुंबीयांर्पयत सुखरूप पोहचली. 
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील नीलम नरेंद्र कश्यप (वय 41) या आग्रा येथून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना संदेश देण्यात आले होते. त्यानुसार येथील लोहमार्ग सतर्क होते. भुसावळ येथील प्रभारी पोलीस अधिकारी उज्ज्वल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार इंगळे, हवादलार आनंद सरोदे, नाईक महिला पोलीस कर्मचारी अलका आढाळे, हवालदार वाघ, नरेंद्र लोढे यांना नीलम कश्यप ही महिला भुसावळ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर आढळून आली. पोलिसांनी या महिलेच्या नातेवाइकांना ही घटना कळविली. तिला तिचा भाऊ रमेश प्रजापती यांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Succesfully rescued by women police from Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.