गौण खनिज प्रकरणी सीईओंना अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:37+5:302021-09-16T04:22:37+5:30
जिल्हा परिषदेच्या गौणखनिज प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सदस्य पल्लवी सावकारे यांच्याकडून दीड वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत आहे. ...

गौण खनिज प्रकरणी सीईओंना अहवाल सादर
जिल्हा परिषदेच्या गौणखनिज प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सदस्य पल्लवी सावकारे यांच्याकडून दीड वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत आहे. या गैरव्यवहारप्रकरणी गेल्या महिन्यात सावकारे यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ पंकज आशिया यांच्याकडे सर्व पुरावे सादर केले होते. यावर आशिया यांनी रणदिवे यांना सविस्तर अहवाल तयार करण्याचे सांगितले होते. मात्र, प्रशासनाकडून हा अहवाल विलंबाने होत असून, या गैरव्यवहाराप्रकरणी प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याबद्दल पल्लवी सावकारे यांनी मंगळवारी झालेल्या जलसिंचन सभेत पुन्हा या प्रकरणी आवाज उठविला होता. दरम्यान, या प्रकरणी रणदिवे यांनी बुधवारी गौण खनिजाचा अहवाल पंकज आशिया यांना सादर केला आहे. त्यामुळे आशिया हे कधी कारवाईची भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.