संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : कोरोनाच्या अनुषंगाने सुट्यांचा सदुपयोग व्हावा अन् अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाशी जुळवून ठेवण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक व्ही.आर.सोनवणे, चहार्डी येथे विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुरेश श्यामराव पाटील व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक करीत आहे.१४ एप्रिल दरम्यान इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दररोज आॅनलाईन यु ट्यूबच्या माध्यमातून नावीण्यपूर्ण अशा डिजिटल पद्धतीने दुतर्फा आणि सुलभ असा अभ्यास देण्यात येत आहे. वर्गाच्या यु ट्यूबच्या गटातून शिक्षक अभ्यास देतात व विद्यार्थी अडचण असेल तर लगेच आॅनलाईन शंका विचारतात. शंकेचे निरसन लगेच केले जाते. म्हणून सुटीच्या काळातही ग्रामीण भागातील या विद्यालयाने विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेत गुंतवून ठेवले आहे. ग्रामीण भागातील शाळा असून विद्यार्थ्यांसोबत इंटरनेटच्या माध्यमातून जोडून ठेवले आहे. विशेषत: सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना या पद्धतीचा खूप फायदा होत आहे. हा नावीण्यपूर्ण उपक्रम ग्रामीण भागात राबवणारी पहिली शाळा ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.
चहार्डी येथे विद्यार्थी करताहेत आॅनलाईन अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 14:53 IST
चहार्डी येथे विद्यार्थी आॅनलाईन अभ्यास करताहेत
चहार्डी येथे विद्यार्थी करताहेत आॅनलाईन अभ्यास
ठळक मुद्देनवीन उपक्रमशिक्षकांनी केलेले अध्यापन यु ट्यूबद्वारा पोहचते घरोघरी