शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चौकातला कट्टा, छतावर बसून विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 19:54 IST

'पॉलिटेक्निक'च्या परीक्षा प्रारंभ : विद्यार्थ्यांच्या सोडविला जात आहेत अडचणी

जळगाव : कोरोनामुळे ऑनलाईन पध्‍दतीने परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना घरूनच परीक्षा देण्‍याची मुभा दिली असली तरी आपल्या मित्रांसमवेत परीक्षा देण्‍याची मजाच काही और असते. असे म्हणत अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र जमून परीक्षा दिली तर काहींनी चौकातला कट्टा, घराच्या पार्किंगसह छतावर बसून ऑनलाईन परीक्षा पार पाडली.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात सूचना तसेच वेळापत्रक जाहीर केले होते. जळगाव जिल्हयातून सुमारे तीन ते चार हजाराच्यावर विद़यार्थी डिप्लोमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा देणार आहेत. मंगळवारपासून पॉलिटेक्निकच्या परीक्षांना सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी बॅकलॉक विषयाचे पेपर झाला. बुधवारी रेग्यूलर विषयांच्या परीक्षांना सुरूवात झाली आहे. ही परीक्षा सकाळ व दुपार अश्या दोन सत्रात घेण्‍यात येत आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक तर दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत ही परीक्षा विद्यार्थी देत आहेत.यंदा आमचा हा वेगळाच अनुभव...परीक्षेसाठी विद्यार्थी चौकातील कट्टयावर जमले होते तर काही ठिकाणी चहाचा आस्वाद घेत परीक्षा देतानाचे चित्र होते. आम्हाला कधी वाटलंही नाही, अशा पध्‍दतीने आम्ही परीक्षा देउ शकतो. परीक्षा ही फक्त वर्गातच बसून देता येते आम्हाला वाटत होते. पण यंदा आमचा हा वेगळाच अनुभव आम्हाला मिळाला, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.अविस्करणीय परीक्षा राहिल असे, मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांनी घरातचं थांबून तर काहींनी आपल्या घराच्या छतावर बसून परीक्षा दिली.प्राध्‍यापकांनी सोडविल्या अडचणी....ऑनलाईन पेपर सोडवित असताना काही विद़यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, विद़यार्थ्यांनी लागलीच प्राध्‍यापकांशी संपर्क साधून ती अडचण सोडवून घेत परीक्षा दिली.

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव