या समस्येमुळे पालकवर्ग नाराजी व्यक्त करत आहे. शाखा व्यवस्थापक नितीन पाटील यांची सात ते आठ महिन्यात बदली झाल्यानंतर किमान दीड ते दोन महिन्यात चार ते पाच शाखा व्यवस्थापक बदलल्याने सहीअभावी विद्यार्थ्यांचे बँकेत १८७ खात्यांपैकी आतापर्यंत फक्त सत्तरच खाती सुरू झाली आहेत, असे शाळेकडून सांगण्यात आले. बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे अजूनही ११७ विद्यार्थी शिष्यवृत्ती अनुदानापासून वंचित असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पालकांची आपल्या मुलांची राष्ट्रीयीकृत बँकेतच खाते उघडण्याच्या सूचना आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बाहेरगावी अन्य बँकेत नाइजास्तव खाते खोलण्यासाठी हेलपाट्या माराव्या लागत असल्याचे सांगण्यात।आले.
माझा मुलगा जिल्हा परिषद मराठी शाळेत शिकत असून, मला शासनाच्या शिष्यवृत्ती अनुदानासाठी बँकेत खाते खोलण्यासाठी शिक्षकांकडून कळविण्यात आल्याने मी सर्व कागदपत्रे देऊनही बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे बँकेत दीड ते दोन वर्षांपासून हेलपाटे मारत आहे दोन वर्षानंतर माझ्या मुलाचे खाते खोलण्यात आले.
कैलास कोळी, पालक
हेडसर, अजबसिंग पाटील कढोली एसबीआय शाखेत