‘त्या’ प्रकरणी विद्यार्थी संघटनेचा ‘यू-टर्न’?

By Admin | Updated: September 24, 2015 00:05 IST2015-09-24T00:05:39+5:302015-09-24T00:05:39+5:30

धुळे : आदिवासी मुलींच्या वसतिगृहात चार विद्यार्थिनींना गुणवत्तेचे निकष डावलून देण्यात आलेल्या प्रवेश प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ला झळकताच आदिवासी विद्यार्थी संघटनेने ‘यू-टर्न’ घेतला आह़े

Student organization's U-turn? | ‘त्या’ प्रकरणी विद्यार्थी संघटनेचा ‘यू-टर्न’?

‘त्या’ प्रकरणी विद्यार्थी संघटनेचा ‘यू-टर्न’?

धुळे : शहरातील साक्री रोडवर असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात चार विद्यार्थिनींना गुणवत्तेचे निकष डावलून देण्यात आलेल्या प्रवेश प्रकरणाचे वृत्त लोकमतला झळकताच आदिवासी विद्यार्थी संघटनेने यू-टर्नघेतला आह़े मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या साळवेविरुद्ध गुन्हा दाखल होण्यास टाळाटाळ होत असल्याने अधीक्षिका आय़क़े चव्हाण संशयाच्या भोव:यात सापडत असल्याचे दिसून येत आह़ेलोकमतला प्रकाशित होताच बुधवारी आदिवासी विद्यार्थी संघटनेने अधीक्षिका चव्हाण यांची भेट घेतली़

आदिवासी विद्यार्थी संघटनेने त्या चार मुलींच्या प्रवेशावरून प्रकल्पाधिका:यांच्या कार्यालयात वसतिगृह अधीक्षिका आय़क़े चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होत़े संघटनेच्या विद्याथ्र्यानी वादग्रस्त शब्दप्रयोग केल्याने अधीक्षिका चव्हाण यांना अश्रू अनावर झाले होत़े याबाबतचे वृत्त

आपल्याबद्दल केलेले सर्व आरोप मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले व तसे लेखी देण्याचेही आश्वासन दिल्याची माहिती अधीक्षिका चव्हाण यांनी दिली़ तर याबाबत आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंत वळवी यांनी याप्रकरणी वरिष्ठांसह कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केल़े

मात्र अधीक्षिका चव्हाण यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रकल्पाधिकारी बी़एस़देवरे यांनी वरिष्ठांना सादर केला असून तो विद्यार्थी संघटनेच्या पत्रानंतर मागे घेतला जाण्याची शक्यता आह़े मात्र प्रकल्पाधिकारी कार्यालयात अधीक्षिका चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणा:या विद्यार्थी संघटनेने अचानक माघार का घेतली? हा प्रश्न आता उपस्थित होत आह़े आदिवासी विद्यार्थी संघटनेने अचानक माघार घेण्याचे कारण काय? हे स्पष्ट झालेले नाही़ तर दुसरीकडे त्या चार विद्यार्थिनींनी लेखी खुलासा दिलेला असतानाही अधीक्षिका चव्हाण यांच्याकडून साळवेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत असून त्यांनी पैसे घेऊन त्या चार विद्यार्थिनींना प्रवेश दिल्याचा संशय निर्माण होत आह़े याबाबत गुरुवारी तरी साळवेविरुद्ध गुन्हा दाखल होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आह़े

आदिवासी विद्यार्थी संघटनेने याप्रकरणी तडजोड करण्याचे प्रयत्न चालविले असल्याचीही माहिती मिळाली आह़े साळवेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येणार आह़े याबाबत गुरुवारी आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून काय निर्णय घेतला जातो, त्यावर या प्रकरणाचे कोडे उलगडणार असले तरी साळवेविरुद्ध गुन्हा दाखल होणे गरजेचे आह़े .

''आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिका:यांनी भेट घेतली आह़े त्यांनी माङयावर केलेल्या आरोपांबाबत पुनर्विचार करून आरोप मागे घेण्याचे आश्वासन दिले आह़े तसेच लेखी देण्याची तयारीही दर्शविली आह़े मात्र साळवेवर गुन्हा दाखल करणेही आवश्यक आह़े''

-आय़ क़े

अधीक्षिका, मुलींचे वसतिगृह

. चव्हाण,

 

Web Title: Student organization's U-turn?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.