शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विद्यार्थी खून प्रकरण : ‘कबीर सिंग’ पाहिल्यानंतर संचारले खुनाचे भूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:46 IST

शहरात दहशत निर्माण करण्याचा निर्धार अन् मुकेश सपकाळेची हत्या

सुनील पाटीलजळगाव : कबीर सिंग हा चित्रपट पाहिल्यानंतर किरण अशोक हटकर याच्या अंगात खूनाचे भूत संचारले. आणि तेव्हाच त्याने शहरात दहशत व सनसनाटी निर्माण करण्याचा निर्धार त्याने केला होता. शनिवार मू.जे.महाविद्यालयात झालेल्या भांडणात कानशिलात लगावल्यामुळे संतापात मुकेशचा गेम झाला अशी स्पष्ट कबुली किरण याने तपासात दिली आहे, त्यामुळे मुकेशच्या हत्येमागे अन्य दुसरे कोणतेच कारण नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे (२३, रा. आसोदा) याचा शनिवारी मू. जे. महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये चॉपरने भोसकून खून झाला होता. किरण हटकर यानेच मुकेशवर चॉपरने सपासप वार केले. त्यानंतर किरण व त्याचे साथीदार घटनास्थळावरुन पाचोरा आणि तेथून थेट पुणे येथे रवाना झाले. पोलिसांनी रविवारी दुपारी पुण्यातील सिंहगड येथून कार्तिक चौधरी याच्या फ्लॅटमधून किरण हटकर, अरुण बळीराम सोनवणे, तुषार नारखेडे, मयुर माळी व समीर शरद सोनार यांच्या मुसक्या आवळल्या. घटनेच्याच दिवशी इच्छाराम पुंडलिक वाघोदे (रा.समता नगर) याला ताब्यात घेतले होते.प्लंबर बनून केली संशयितांना अटककिरण व त्याचे सहकारी पुणे येथे गेले असावेत अशी शक्यता विजयसिंग पाटील यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत जाणवले. त्यानुसार विजयसिंग पाटील यांनी पुणे येथील कार्तिक याच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाला हेरले. त्याला सोबत घेऊन थेट पुणे गाठले.रात्री प्रवासात कार्तिक याच्याशी त्याचे बोलणे सुरु ठेवले. हे पाचही जण अजून आलेच नाही असे कार्तिककडून सांगितले जात असताना पहाटे पाच वाजता कार्तिकचा या तरणाला मीस्ड कॉल आला. परत फोन केल्यावर तुझ्याशेजारी कोण आहेत? याची विचारणा कार्तिकने केली अन् तेथेच पोलिसांना ठाम अंदाज आला. पुण्यात पोहचल्यावर सिंहगड भागात सुदर्शन प्रेसीडेंट या अपार्टमेंटमध्ये कार्तिक असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी प्लॅट मालकाचा शोध घेतला. मालक शंकर रागी यांना थोड्यावेळापूर्वीच फ्लॅटमध्ये पाणी येत नाही, प्लंबर पाठवा म्हणून कार्तिकचा फोन आला होता. सहायक निरीक्षक सागर शिंपी व विजयसिंग पाटील या दोघांनी रागी याला सोबत घेऊन कार्तिकचा फ्लॅट गाठला. दरवाजा उघडताच प्लंबर आलेले आहेत असे सांगून घरात प्रवेश केला असता पाचही जण एका ठिकाणी बसलेले होते. आतून दरवाजा बंद करताच शिंपी व पाटील यांनी पोलीस असल्याची ओळख दिली. बेडशीट फाडून पाचही जणांचे हात बांधले आणि काही अंतरावर थांबलेले पथक वाहनासह इमारतीजवळ बोलावले. यावेळी स्थानिक एका पोलिसाचीही मदत घेण्यात आली होती.घटनेच्या दोन दिवस आधी पाहिला कबीर सिंगकिरण हटकर व त्याच्या चार मित्रांनी घटनेच्या दोन दिवस आधी शहरातील चित्रपटगृहात कबीर सिंग हा चित्रपट पाहिला. त्यातील नायक शाहीद कपूर हा एका वैद्यकिय महाविद्यालयाचा टॉपर विद्यार्थी असतानाही तो रॅगिंग करतो. तेथे त्याचे एका मुलीशी प्रेमप्रकरण बहरते, मात्र तिच्या कुटुंबाकडून लग्नाला विरोध होतो. प्रेमभंग झाल्याने त्याचा प्रचंड संताप होतो. त्यामुळे तो ‘अ‍ॅँग्री यंगमॅन’ बनतो.याच ‘अ‍ॅँग्री यंगमॅन’ च्या भूमिकेत किरण हटकर यानेही स्वत:त बदल करुन शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लिंबू राक्या हा महाविद्यालयात दहशत निर्माण करीत असल्याने आधी त्याचाच गेम करण्याचे किरणने ठरविले. एका मित्राच्या मैत्रीणीचे लिंबु राक्याच्या मित्राने नाव घेतले होते. तेव्हा लिंबू राक्या याने मोबाईलवर किरण याला शिवीगाळ केली होती. तेव्हापासून तो किरणच्या रडारवर होता. घटनेच्या दिवशी देखील लिंबू राक्या महाविद्यालयात आल्याची माहिती किरणला होती. त्याच काळात इच्छाराम याचा रोहीत सपकाळे याच्याशी वाद झाला. त्याने किरण व सहकाऱ्यांना बोलावून घेतले. तेव्हा भावाला मारहाण होत असल्याने मुकेशने किरणच्या कानशिलात लगावली. त्यामुळे राग अनावर होऊन किरण याने मुकेशवर सपासप वार केले.पुलीस के हात बहोत लंबे होते है !मुकेश याचा खून झाल्यानंतर समीर वगळता चारही जण पाचोºयात पोहचले. त्यानंतर एका मित्राला समीर याने पाचोरा सोडायला लावले. घटनेनंतर पाचही जणांनी आपले मोबाईल बंद केले. एका मित्राशी संपर्क करुन बॅँक खात्यात २० हजार रुपये जमा करायला सांगितले. जळगाव सोडताना एकाला मुंबई तर दुसºयाला मनमाड जात असल्याचे या पाचही जणांनी सांगितले. पोलिसांची दिशाभूल करणे हा त्यामागील उद्देश होता. समीर हा पोलीस कर्मचाºयाचा मुलगा असल्याने त्याने चारही जणांना ‘पुलीस के हात बहोत लंबे होते है’ असे सांगितले, मात्र आपण मोबाईल बंद केलेले आहेत, त्याशिवाय कार्तिककडे जात असल्याचे हे स्वत: कार्तिकलाही सांगितले नाहीत, त्यामुळे आपण कोणालाच सापडणार नाही असा ठाम विश्वास किरण याला होता.एस.पी.नीच निवडले तपास पथकया गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनीच स्वत: विजयसिंग पाटील यांना फोनकरुन बोलावून घेतले. सहायक निरीक्षक सागर शिंपी, विजयसिंग पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख व किरण धनगर यांना पुण्यात रवाना केले तर विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात तांत्रिक माहितीसाठी तर सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व भास्कर पाटील यांना स्थानिक ते पुणे संपर्क ठेऊन इतर हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविली होती. डॉ.उगले हे दर तासांनी पुणे येथील पथक व विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांच्याकडून माहिती घेत होते. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व बी.जी.रोहम हे देखील सातत्याने पथकाच्या संपर्कात होते.आरोपी हाती लागल्याचा निरोप मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.या गुन्ह्यात काम करणाºया पथकाचे एस.पींनी कौतुक केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव