Student-made crop protection equipment | विद्यार्थ्याने बनविले पीक संरक्षणासाठी उपकरण
विद्यार्थ्याने बनविले पीक संरक्षणासाठी उपकरणमहिंदळे, ता. भडगाव : तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनातून सामाजिक गरजा ओळखून शालेय जीवनातील बाल वैज्ञकांनी आधुनिक उपकरणे सादर केली विज्ञान प्रदर्शनातून विध्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी या उद्देशाने कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्या मंदिर महिंदळे शाळेत पंचायत समिती भडगाव यांच्या वतीने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार चिमणराव पाटील, जि. प. चे शिक्षण सभापती पोपटराव भोळे, संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, पं. स. सभापती रामकृष्ण पाटील, जि. प. सदस्य स्नेहा गायकवाड, संजय पाटील, जालिंदर चित्ते, डॉ.विशाल पाटील, गटविकास अधिकारी अमोल जाधव गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, गणेश पाटील, विजय कुमावत, केंद्र प्रमुख संजय न्याहिदे उपस्थित होते.
प्रदर्शनात तसलुक्यातील ८२ शाळांनी सहभाग नोंदवला. यात प्राथमिक व माध्यमिक गट करण्यात आले होते. यात प्राथमिक गटात रमजानभाई इस्माईल खाटीक, जानवी पाटील, भूषण अहिरे, तर वरिष्ठ गटातून कोमल चौधरी, अक्षदा देवरे, सौरभ पाटील, या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकवला. मान्यवरांनी चिमुकल्यांनी संशोधन केलेल्या प्रतीक्षिताची पाहणी केली व भरभरून कौतुक केले.
यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ए.पी. बागूल, डी.डी. पाटील, ए.पी.पाटील, के.एम. पाटील, के. जी. पाटील, बी. एन. पाटील, बी आर. सोमवंशी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसह पालकवर्ग उपस्थित होते.

 

 

Web Title:  Student-made crop protection equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.