भुसावळ येथे मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या अमरावतीच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 21:53 IST2018-02-21T21:50:43+5:302018-02-21T21:53:09+5:30
भुसावळ येथे मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या नेहल श्रीराम गायधनी (वय २२ रा.अमरावती, ह.मु.विद्युत कॉलनी, जळगाव) हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला परत येत असताना भरधाव टॅँकरने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता महामार्गावर गोदावरी हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालयासमोर घडली.

भुसावळ येथे मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या अमरावतीच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला ट्रकने चिरडले
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२२: भुसावळ येथे मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या नेहल श्रीराम गायधनी (वय २२ रा.अमरावती, ह.मु.विद्युत कॉलनी, जळगाव) हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला परत येत असताना भरधाव टॅँकरने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता महामार्गावर गोदावरी हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालयासमोर घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयात ई.अँड टी.सी.च्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असलेला नेहल हा मुळचा अमरावती येथील रहिवाशी आहे. विद्युत कॉलनीत मित्रांसोबत भाड्याने घर घेऊन तो तेथे राहत होता. बुधवारी अमरावती येथीलच त्याच्या मित्राचा वाढदिवस असल्याने नेहल हा दुपारी एका मित्राला घेऊन भुसावळ येथे दुचाकीने (क्र.एम.एच.२७ ए.के.३८५६) गेला होता. तेथून साडे पाच वाजता तो एकटाच परत यायला निघाला. गोदावरी हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालयाच्या समोर महामार्गावर दुचाकी घसरल्याने मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने (क्र.एम.एच.०४ सी.पी.३३६५) त्याला जोरदार धडक दिली. त्यात त्याच्या डोक्यावरुन टायर गेल्याने तो जागीच गत प्राण झाला.
वाहन परवान्यावरुन पटली ओळख
अपघात होताच टॅँकर चालक जागेवरुन पसार झाला. रस्त्यावरुन जाणारे राजेश रंगनाथ नाईक (रा.जळगाव) यांनी तत्काळ मदत कार्य केले. नशिराबाद पोलिसांना घटनेची माहिती दिली. एका रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, घटनास्थळावर त्याच्या खिशातील पाकीटामध्ये वाहन परवाना होता. त्यातील फोटो व नावावरुन नेहलची ओळख पटली.