आठवडे बाजारातील जागेवरुन सावद्यात दंगल
By Admin | Updated: February 28, 2017 16:26 IST2017-02-28T16:26:44+5:302017-02-28T16:26:44+5:30
रावेर तालुक्यातील चिनावल येथे मंगळवारच्या आठवडे बाजारात जागेवरुन व्यापा-यांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी तुफान दगडफेक झाली.

आठवडे बाजारातील जागेवरुन सावद्यात दंगल
>ऑनलाइन लोकमत
सावदा, दि. 28 - रावेर तालुक्यातील चिनावल येथे मंगळवारच्या आठवडे बाजारात जागेवरुन व्यापा-यांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी काही लोकांनी दगडफेक आणि मारहाण केली. यामुळे महिलांसह अनेक जण जखमी झाले आहेत.
हजारोचा समुदाय रस्त्यावर उतरला आहे. अख्या चिनावल गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र पळापळ आणि भितीदायक स्थिती आहे.
मंगळवारी दुपारी दोन-तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे. एका समाजाकडून महिलांना मारहाण झाल्याने संतापाचे वातावरण पसरले आहे.
सावद्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी धावून गेले आहे.