जामनेरमधील गौरवचा जगण्यासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST2021-09-17T04:21:16+5:302021-09-17T04:21:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : पुरा भागातील रहिवासी गौरव नंदू खाटीक (१७ ) हा मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून ...

जामनेरमधील गौरवचा जगण्यासाठी संघर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : पुरा भागातील रहिवासी गौरव नंदू खाटीक (१७ ) हा मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. त्याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे सांगण्यात आले. कुटुंबात मोलमजुरी करणारे आई- वडील आहेत. ज्यांचा आधार आहे तोच गौरव आज जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्याच्या जगण्याच्या संघर्षाला मदतीच्या हातांची गरज आहे.
गौरववर सध्या उपचार सुरु असून उपचाराचा खर्च मजुरी करणाऱ्या आई, वडिलांना उचलणे शक्य होत नाही.
पुरा भागातील रहिवासी, मित्र परिवार व सामाजिक कार्यकर्ते उपचारासाठी मदत गोळा करीत आहे. त्याची आई किडनी देणार आहे. यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. किडनी शस्त्रक्रिया पुढील महिन्यात करावयाची असल्याने समाजातील दानशूर मंडळींनी मदत करण्याचे आवाहन काँग्रेसचे युवक अध्यक्ष दीपक राजपूत यांनी केले आहे. उपचारासाठी मदत करु इच्छिणाऱ्यांनी सचिन बोरसे व दीपक घन यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो