जळगावात मनपाच्या अतिक्रमण हटाव पथक व हॉकर्समध्ये जोरदार वाद
By Admin | Updated: May 15, 2017 13:13 IST2017-05-15T13:13:34+5:302017-05-15T13:13:34+5:30
सोमवारी सकाळी जोरदार वाद होऊन तो पोलीस ठाण्यार्पयत पोहचला

जळगावात मनपाच्या अतिक्रमण हटाव पथक व हॉकर्समध्ये जोरदार वाद
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 15 - नवीन जागेत स्थलांतरास नकार देत आहे त्याच ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या हॉकर्स व जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामध्ये सोमवारी सकाळी जोरदार वाद होऊन तो पोलीस ठाण्यार्पयत पोहचला.
जळगाव शहरात बळीराम पेठ व सुभाष चौक परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भाजीपाला विक्रेते व्यवसाय करीत आहे. त्यानंतर आता शहरातीलच ख्वाजामियॉ चौक परिसरात मनपाने 750 हॉकर्सना पर्यायी जागा दिली आहे. तेथे त्यांनी आज स्थलांतर करावे व बळीराम पेठ आणि सुभाष चौकात बसू नये, अशा मनपाने सूचना दिल्या होत्या. सोमवारी या विक्रेत्यांनी आहे त्या ठिकाणी पुन्हा व्यवसाय थाटल्याने मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक तेथे पोहचले. त्यावेळी विक्रेत्यांनी नवीन जागेत जाण्यास नकार दिला आणि अतिक्रमण हटविताना कर्मचारी व हॉकर्समध्ये जोरदार वाद झाला. मनपा कर्मचा:यांनी आमचे तराजू व इतर साहित्य फेकून दिल्याचा आरोप हाकर्सनी केला आहे. हा वाद नंतर पोलीस ठाण्यार्पयत पोहचला.