जळगावात वाहन लावण्यावरून तरुणांमध्ये जोरदार हाणामारी
By Admin | Updated: April 28, 2017 18:07 IST2017-04-28T18:07:09+5:302017-04-28T18:07:09+5:30
नटवर मल्टीप्लेक्स समोरील घटना : वाहतूक ठप्प

जळगावात वाहन लावण्यावरून तरुणांमध्ये जोरदार हाणामारी
जळगाव,दि.28- बाहुबली 2 हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला़ शहरातील सिनेमागृहामध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी तरुणांची गर्दी उसळत आह़े नटवर मल्टीप्लेक्सजवळ हाच चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांमध्ये वाहन लावण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाल्याची घटना सकाळी 11़30 वाजेच्या सुमारास घडली़
नटराज मल्टीप्लेक्सजवळ सेंट्रल बँक ऑफ इंडियानजीक वाहनांची गर्दी झाली होती़ दुपारी 12 वाजेचा शो पाहण्यासाठी एक तरुण आपल्या मित्रांसमवेत सिनेमागृहानजीक आला़ दुचाकी लावण्यासाठी जागा शोधत असताना याचठिकाणी गाडी लावण्यासाठी आलेल्या दुस:या तरुणाने दुसरीकडे गाडी लावावी असे त्यास सांगितल़े यावरून दोन्ही तरुणांमध्ये वाद झाला व वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल़े