भरधाव चारचाकी आदळली ट्रकवर
By Admin | Updated: January 21, 2017 00:24 IST2017-01-21T00:24:20+5:302017-01-21T00:24:20+5:30
पुन्हा अपघात : रेमंड चौफुलीनजीकची रात्री 8.30 वाजेची घटना

भरधाव चारचाकी आदळली ट्रकवर
जळगाव : दारूच्या नशेत तर्र्र असलेला ब:हाणपूर येथील चालक चारचाकी घेवून भरधाव वेगाने कुसुंब्याकडे जात असताना त्याने समोरून येत असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली़ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील आदित्य फार्म कंपनीसमोर हा अपघात झाला. या अपघातात चारचाकी चालक जखमी झाला. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल़े रूग्णालयात घेवून जातानाही पोलीस वाहनातून त्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला़
अमित अमीर शिरतुरे (वय-35, रा़ ब:हाणपूर) हा चारचाकी(क्र ़ एम़पी़ 09 बी़सी़8159) घेवून भरधाव वेगाने कुसूंब्याकडे जात होता़ यादरम्यान त्याने रेमंड चौकाजवळील आदित्य फार्म कंपनीसमोर जळगावकडे येत असलेल्या ट्रकला (क्र ़ एम़एच़19़ ङोड 2123) ला जोरदार धडक दिली़ अपघातात चारचाकीच्या काचा फुटल्या तसेच ट्रकचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल़े चालक शिरतुरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील कंपनी कामगार तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली़ काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला ़एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ रस्त्यातील अपघातग्रस्त चारचाकी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली़
अपघातानंतर जखमी अवस्थेतचालक अमीर शिरतुरे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला़