सट्टा व्यावसायिकांमध्ये हाणामारी
By Admin | Updated: October 10, 2015 01:26 IST2015-10-10T01:26:50+5:302015-10-10T01:26:50+5:30
जळगाव : सट्टा व जुगाराच्या हद्दीवरून सट्टा व्यावसायिक धुडकू सपकाळे तसेच दीपक सोनार या दोघांमध्ये शुक्रवारी पांडे चौक व त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात जोरदार हाणामारी झाली.

सट्टा व्यावसायिकांमध्ये हाणामारी
जळगाव : सट्टा व जुगाराच्या हद्दीवरून सट्टा व्यावसायिक धुडकू सपकाळे तसेच दीपक सोनार या दोघांमध्ये शुक्रवारी पांडे चौक व त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात जोरदार हाणामारी झाली. पोलीस स्टेशनला जाण्याआधीच एका पोलीस कर्मचा:याने बाहेर दोघांची समजूत घालून हा वाद मिटविल्याचा प्रय} केल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरुवात पांडे चौकापासून दीपक व शरद तायडे हे दोघे पांडे चौकात उभे असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास धुडकू सपकाळे हा तेथे आला. तू माङया हद्दीत धंदा का सुरू केला म्हणून त्याने जाब विचारला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन हाणामारी झाली. तेथून दोघेही तक्रार देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे आले. तेथेही वाद होऊन दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हा प्रकार तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी उघडय़ा डोळ्यांनी पाहत होते. पोलीस अधीक्षक क्राइम मिटिंगमध्ये असल्याचे समजल्याने दीपक हा जिल्हापेठ पोलीस स्टेशन तक्रार देण्यासाठी निघाला असतानाच त्याला पोलिसांच्या हॉटेल मानससमोर सुरू केला धंदा एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एमआयडीसी, सुप्रीम कॉलनी, ट्रान्सपोर्टनगर, आर.एल. चौक, धान्य मार्केट, भारत पेट्रोलियम व मेहरूण भागात धुडकू सपकाळे याचे सट्टय़ाचे अड्डे आहेत, तर मनसेचा कार्यकर्ता असलेल्या दीपक याने भुसावळ रस्त्यावर हॉटेल मानससमोर सट्टा सुरू केला. दरमहा पोलिसांना