बोदवड येथे पाळला कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 17:54 IST2020-11-06T17:54:10+5:302020-11-06T17:54:22+5:30
निषेध :बालिका हत्याप्रकरण

बोदवड येथे पाळला कडकडीत बंद
बोदवड : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत हत्या केल्याच्या निषेधार्थ ६ रोजी आदिवासी समाज बांधवांनी बोदवड बंदची हाक दिली होती, त्या बंदला प्रतिसाद दिल्याने संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण बाजार पेठ बंद होती .
दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही दुकानदारांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला असता आदिवासी समाजातर्फे ती पुन्हा बंद करण्यात आली.
तर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सदर घटनेच्या निषेधार्थ फलक ही लावले होते. रणजित मोरे, संजू गायकवाड, राजेश मोरे, कालू गायकवाड, विनोद मोरे, सुनील सोनवणे, रोहिदास पवार, शक्ती गायकवाड, अरुण गायकवाड, मनोज मोरे, संतोष मोरे, भूरालाल गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.