जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:12+5:302021-06-26T04:13:12+5:30

जळगाव : राज्यात आणि जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशाने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू ...

Strict restrictions again in the district | जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

जळगाव : राज्यात आणि जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशाने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अत्यावश्यक आणि इतर सर्व सेवा चार वाजताच बंद केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. हे नियम रविवार, दि.२७ जूनपासून लागू केले जाणार आहेत.

राज्यशासनाने दुपारी चार वाजता राज्यातील सर्व जिल्ह्यांना पुन्हा एकदा लेव्हल ३ चे नियम लागू करत असल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता पुन्हा एकदा चार वाजता दुकाने बंद होतील. यात अत्यावश्यक सेवेत असलेली खाद्यपदार्थांची दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच खुली राहतील. अत्यावश्यक सेवेत नसलेली इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार या वेळेत दुपारी चार वाजेपर्यंतच खुली असतील. तर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद राहतील. त्यासोबतच जिल्हाभरातील मल्टीप्लेक्स आणि मॉल्स, नाट्यगृहे बंद असतील. वैद्यकीय सेवा नेहमीच सुरू होतील.

जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता रविवारपासून निर्बंध लागू केले जाणार आहेत.

Web Title: Strict restrictions again in the district