धार्मिक कार्यक्रमाचा फलक फाडल्याने तणाव
By Admin | Updated: October 9, 2015 00:08 IST2015-10-09T00:08:13+5:302015-10-09T00:08:13+5:30
धुळे : धार्मिक कार्यक्रमाचा फलक हेतुपुरस्सरपणे फाडल्याने शहरातील चितोड नाका परिसरात गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

धार्मिक कार्यक्रमाचा फलक फाडल्याने तणाव
धुळे : धार्मिक कार्यक्रमाचा फलक हेतुपुरस्सरपणे फाडल्याने शहरातील चितोड नाका परिसरात गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भाईजीनगरातील शाळा क्रमांक 28 च्या मैदानावर इंद्रदेव महाराज यांच्या भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 16 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार असून त्याच्या प्रसिद्धीसाठी कार्यक्रमाच्या आयोजकांकडून बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने तसेच पूर्ववैमनस्यातून संशयित महेंद्र राजाराम सरगर व टाल्या उर्फ राहुल गजानन थोरात (दोन्ही रा.रंगारी चाळ, चितोड रोड, धुळे) यांनी कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचे बॅनर फाडून पळ काढला, असे फिर्यादी मनोज रमेश पिसे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आह़े फिर्यादीवरून दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरार्पयत सुरू होते.