युवकास मारहाण केल्याने तणाव
By Admin | Updated: October 10, 2015 01:12 IST2015-10-10T01:12:20+5:302015-10-10T01:12:20+5:30
नंदुरबार : रहदारीचे नियम मोडल्याच्या कारणावरून पोलिसांनी एका युवकास मारहाण केली. ही बाब त्याच्या नातेवाईकांना समजल्यावर शहर पोलीस ठाणे आवारात रात्री एकच गर्दी झाली होती.

युवकास मारहाण केल्याने तणाव
नंदुरबार : रहदारीचे नियम मोडल्याच्या कारणावरून पोलिसांनी एका युवकास मारहाण केली. ही बाब त्याच्या नातेवाईकांना समजल्यावर शहर पोलीस ठाणे आवारात रात्री एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हाटदरवाजा चौकात डय़ुटीवर असलेल्या पोलीस कर्मचा:याने दुचाकीवरून रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणा:या युवकाला मारहाण केली. मारहाण जबरदस्त असल्याने युवकाला असह्य वेदना झाल्याचा आरोप करीत त्याचे नातेवाईक शहर पोलीस ठाण्यात धावून आले. बंधारहट्टीसह परिसरातील इतर नातेवाईकांनाही ही बाब कळाल्यावर शहर पोलीस ठाण्यात एकच गर्दी झाली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. पोलीस निरीक्षक अनील कटके यांनी समजूत काढल्यानंतर तणाव निवळला.