धरणगावच्या श्री बालाजी मंदिर जीर्णोद्धारासाठी अनोळखी माणसाची ७१ हजारांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:59 IST2020-10-04T15:59:14+5:302020-10-04T15:59:33+5:30
एका अज्ञात गृहस्थाने बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी दिली आहे.

धरणगावच्या श्री बालाजी मंदिर जीर्णोद्धारासाठी अनोळखी माणसाची ७१ हजारांची देणगी
धरणगाव : माणसाची श्रध्दा कशी साधी आणि भक्तीपूर्ण असू शकते याचा प्रत्यय नुकताच धरणगावकरांना आला. एका अज्ञात गृहस्थाने धरणगावच्या श्री बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ७१ हजारांची देणगी दिली आहे.
२० मार्च रोजी चौकशी करत करत श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी.आर.पाटील यांच्याकडे आला होता. त्यावेळी त्या व्यक्तीने सांगितले की, मी २०१० मध्ये श्री मारोतीच्या वहनाच्या दर्शनाला आलो व नमस्कार करून माझ्या कंपनीत मला बढती मिळू दे, अशी प्रार्थना मारोतीरायाला केली होती. ६ महिन्यांनी मला पूर्वलक्षी प्रभावाने बढती मिळाली. यानंतर २६ सप्टेंबर रोजी या अज्ञात व्यक्तीने मागील फरकाची रक्कम श्री बालाजी मंदिराच्या बांधकामासाठी अर्पण केली.
श्री बालाजी मंदिराच्या कामाला सर्वसामान्य लोकही अनामिक राहून सहकार्य करतात याचे हे उदाहरण आहे. अशा उदाहरणामुळे आम्हा काम करणाऱ्यांही उत्साह मिळतो. लवकरच राजस्थानच्या मजुरांना बोलावून पुन्हा मंदिराचे काम पूर्ववत सुरु करणार आहोत, असे मंडळाचे अध्सक्ष डी.आर.पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जीर्णोध्दार प्रमुख जीवन बयस, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी व अशोक येवले यांनी सांगितले.