रेल्वेतून पडल्याने अनोळखीचा मृत्यू; पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
By विजय.सैतवाल | Updated: November 19, 2023 19:58 IST2023-11-19T19:57:51+5:302023-11-19T19:58:00+5:30
याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वेतून पडल्याने अनोळखीचा मृत्यू; पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव : जळगाव ते शिरसोली दरम्यान अप मार्गावर एका अनोळखी तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना रविवार, १९ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव ते शिरसोली दरम्यान अप मार्गावरील खंबा क्रमांक ४१३/२ ते ४१३/४ जवळ धावत्या रेल्वेतून एक अनोळखी तरुण पडला व त्यात तो ठार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहेत.