सादरे प्रकरणाशी संबध नाही: खडसे

By Admin | Updated: October 18, 2015 00:46 IST2015-10-18T00:46:32+5:302015-10-18T00:46:32+5:30

शासनाने या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व तथ्य आढळल्यानंतर दोषींवर कारवाई करावी, असे स्पष्टीकरण महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

The story is not related to the case: Khadse | सादरे प्रकरणाशी संबध नाही: खडसे

सादरे प्रकरणाशी संबध नाही: खडसे

पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येनंतर सादरे यांची पत्नी यांनी आपल्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. अशोक सादरे यांना आपण मागील वर्ष दीड वर्षापासून भेटलो नव्हतो. त्यांचे निलंबन व्हावे यासाठी मी कुठलाही दबाव आणला नाही. या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही. शासनाने या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व तथ्य आढळल्यानंतर दोषींवर कारवाई करावी, असे स्पष्टीकरण महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

सादरेंच्या निलंबनासाठी दबाव आणला नाही

पोलीस निरीक्षक सादरे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यांनी बोदवड, जळगाव, नवी मुंबई येथे कार्यरत असताना वरिष्ठांशी गैरवर्तन केले. ते तीनवेळा निलंबित झाले होते. जळगावात सादरे यांच्यावर खंडणीचा गुन्हा हा न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल झाला. सादरे यांच्या निलंबनासाठी आपण दबाव आणला नाही. तसेच सादरे यांच्या पत्नीला मी ओळखतही नाही, असेही खडसे म्हणाले.

सागर चौधरीचा भाजपाशी संबंध नाही

सुपेकर यांची विभागीय चौकशी

सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर कारवाई करणार का? असे पत्रकारांनी विचारले असता एकनाथराव खडसे म्हणाले, सुपेकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. पण आताच त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही. त्यांची विभागीय चौकशी केली जाईल.

संशयितांची चौकशी करावी

सरकारने सादरे यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये जे संशयित आहेत त्यांची चौकशी करावी. चौकशीत तथ्य आढळल्यानंतर किंवा जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असेही एकनाथराव खडसे म्हणाले.

सुसाईड नोटमध्ये सागर चौधरीचे नाव आहे. भाजपाच्या नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक तो लावतो. तो भाजपाचा कार्यकर्ता आहे का? असे विचारले असता खडसे म्हणाले, सागर चौधरीशी आमचा संबंध नाही. तो भाजपात नाही.

Web Title: The story is not related to the case: Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.