भुसावळ तालुक्यातील चार गावात वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:18+5:302021-06-03T04:13:18+5:30

भुसावळ : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे तालुक्यातील चार गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या ४५ हेक्टर ...

Storm hits four villages in Bhusawal taluka | भुसावळ तालुक्यातील चार गावात वादळाचा फटका

भुसावळ तालुक्यातील चार गावात वादळाचा फटका

भुसावळ : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे तालुक्यातील चार गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या ४५ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले तर एका घराचे पत्रे उडून नुकसान झाले आले.

तालुक्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात तालुक्यातील पिंपरीसेकम, फुलगाव, साकरी, जाडगाव या भागातील ५९ शेतकऱ्यांच्या ४५ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी पावसाने नुकसान झाल्याच्या घटनेनंतर आमदार संजय सावकारे, तहसीलदार दीपक धिवरे, तालुका कृषी अधिकारी धनंजय पोळ यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी ३१ रोजी तालुक्यातील बाधित क्षेत्रातील नुकसानीची पहाणी केली. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा समोर येणार आहे.

सध्या शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. बहुतांश शेती क्षेत्र हे खाली आहे. बागायती क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळीचे पीक उभे आहे. याच केळी पिकावर वादळी पावसाचा परिणाम होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन स्तरावरून या पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Storm hits four villages in Bhusawal taluka