शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ७८ गावांचा पाणीपुरवठा बंद, ८ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 12:50 IST

सामूहिक योजनांचा वीज पुरवठा खंडित केल्याने नागरिकांचे हाल

ठळक मुद्दे१२ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीतसर्वच गावातील नागरिकांचे हाल

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १७ - वीज बिलांच्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडित केल्याने जिल्ह्यातील सामूहिक पाणी पुरवठा योजनेतील ७८ गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे या सर्वच गावातील नागरिकांचे हाल होत आहेत.विविध ठिकाणच्या पाणी योजनेची वीज बिलांची थकबाकी एकूण ८ कोटी ६० लाख ७२ इतकी झाली आहे. याबाबत वीज वितरण विभागाने वारंवार कळवूनही वीज बिले न भरल्याने शेवटी जवळपास गेल्या महिनाभरापासून या विविध ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने पाणी पुरवठा बंद पडला आहे.अशी आहे बिलांची थकबाकीजामनेर तालुक्यातील तोंडापूर पाणी योजनेत १७ गावे असून सुमारे १४ लाखांवर थकबाकी आहे. याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील कळमडू पाणी योजनेत ३ गावे असून ८ लाख ७५ हजार थकबाकी झाली आहे. आडगाव ता. एरंडोल योजनेत १६ गावांचा समावेश असून २८ लाख बाकी आहे. तर भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड या ८० गाव पाणी योजनेत ३४ गावे असून २ कोटी ९५ लाख रुपये थकबाकी आहे. वरणगाव ता. भुसावळ योजनेची १७ लाख थकबाकी झाली असून ५ गावांना फटका बसला आहे.१२ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीतसामूहिक पाणी योजनांकडून जवळपास ११ कोटी ९४ लाख रुपये पाणीपट्टी वसुली व्हायची आहे. वसुली होत नसल्याने वीज बिले भरणे शक्य नसल्याने ही वेळ आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी पाणीपट्टीची थकबाकीही लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे.हातपंप व विहिरींकडे धाव: पाणी पुरवठा बंद झाल्याने अनेक गावांमध्ये हातपंप आणि विहिरींवर पाण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. तर काही ठिकाणी विशेष राष्ट्रीय पेयजल योजनेचा आधार मिळाला आहे. जुने स्त्रोत पुन्हा वापरात आणले जात आहे. मात्र या समस्येवर लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी