आमदारांच्या प्रतिमेला दारुच्या बाटल्यांचा हार घालून रास्ता रोको
By Admin | Updated: May 14, 2017 13:36 IST2017-05-14T13:36:07+5:302017-05-14T13:36:07+5:30
आमदार संजय सावकारे यांच्या प्रतिमेला दारूच्या बाटल्यांचा हार घालून निषेध करण्यात आला़

आमदारांच्या प्रतिमेला दारुच्या बाटल्यांचा हार घालून रास्ता रोको
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - आमदार संजय सावकारे यांनी 47 दारू दुकाने वाचविण्यासाठी पत्र दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय मजदूर सेनेच्यावतीने रविवारी सकाळी 11 वाजता दीपनगरजवळील कपिल वस्तूनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्ग काही वेळ ठप्प झाला़ आमदार संजय सावकारे यांच्या प्रतिमेला दारूच्या बाटल्यांचा हार घालून निषेध करण्यात आला़ आमदारांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली़ कामगार नेते जगन सोनवणे, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाप्रमुख हरिश सुरवाडे, प्रल्हाद गायकवाड, दीपक अडकमोल, गजानन ठाकूर, आरीफ शेख, शगीर शाह, गोपी साळी, बापू गायकवाड, संतोष मेश्राम, छोटू निकम, राजेश मोरे, सुधीर जोहरे, बबलू सिद्दीकी, गजानन च:हाटे व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाल़े