गॅस सिलिंडरसाठी रास्ता रोको

By Admin | Updated: May 14, 2014 00:52 IST2014-05-14T00:52:46+5:302014-05-14T00:52:46+5:30

संतप्त नागरीकांनी मंगळवारी सकाळी येथील पद्मालय गॅस एजंसीनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर एक तास अचानक ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

Stop the way for gas cylinders | गॅस सिलिंडरसाठी रास्ता रोको

गॅस सिलिंडरसाठी रास्ता रोको

 एरंडोल : आठवडाभरापासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण न झाल्यामुळे संतप्त नागरीकांनी मंगळवारी सकाळी येथील पद्मालय गॅस एजंसीनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर एक तास अचानक ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. नागरीकांच्या सहनशिलतेचा उद्रेक होऊन पुकारलेल्या या आंदोलनामुळे तहसिल प्रशासन व पोलीस प्रशासनाची दमछाक झाली. दोन्ही बाजुंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एरंडोल गावापासून सुमारे १ कि.मी.इंडेन गॅस एजंसीचे वितरक पद्मालय गॅस एजन्सी कार्यालय व गोदाम आहे. या एजंसीचे एरंडोल ग्रामीण भागात सुमारे १३ ते १४ हजार ग्राहक आहेत. गेल्या आठवड्यापासून नागरीकांना गॅस हंड्याचे वितरण झाले नसल्याची तक्रार आहे. एजंसी कर्मचारी गॅसधारकांची दिशाभूल करत उडवाउडवीची उत्तरे देतात यामुळ ग्राहक वर्गाचा उद्रेक झाला व लोकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू राहीले. पोलीस निरीक्षक .डी.बी.गायधनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. तर तहसिलदार मिनाक्षी राठोड यांनी एजंसी वरील कर्मचारी व तक्रारदार यांना तहसिल कार्यालयात चर्चेसाठी बोलावून घेतले. यावेळी दोन दिवसापूर्वी पैसे भरल्याच्या पावत्या ग्राहकांनी दाखविल्या तर भातखेडा येथील सुनील सोनार यांनी गॅस हंडीअभावी आपल्या बाळंतीण मुलीला खायला काही देता न आल्याची तक्रार केली. हिलाल चव्हाण यांंनीनी आपले गाºहाणे कथन केले. अखेर पोलीस व तहसील प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Stop the way for gas cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.