भडगावात मोकाट गुरांकडून अघोषित रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 21:16 IST2020-01-04T21:16:41+5:302020-01-04T21:16:50+5:30
भडगाव : शहरात सध्या मोकाट भटकणाऱ्या जनावरांमुळे नागरिकांना रहदारीस त्रासाचे ठरत आहे. शहरातील रस्त्यांवर, चौकांमध्ये जनावरे रस्त्यावर बसल्याने जनावरांचाही ...

भडगावात मोकाट गुरांकडून अघोषित रास्ता रोको
भडगाव : शहरात सध्या मोकाट भटकणाऱ्या जनावरांमुळे नागरिकांना रहदारीस त्रासाचे ठरत आहे. शहरातील रस्त्यांवर, चौकांमध्ये जनावरे रस्त्यावर बसल्याने जनावरांचाही होतोय रास्ता रोको असे चित्र अनेकदा पहावयास मिळते. यासाठी पालिकेने तत्काळ या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांतून होत आहे.
शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून ठिकठिकाणी रस्त्यांवर, बसस्थानक भागाचा परिसर, तहसील कार्यालयासमोरील मेनरोड, बाळद रस्ता, शहरात चौकांमध्ये इतर रस्त्यांवर हे गुरे, गाई आदी जनावरे रस्त्यांमध्येच बसलेले असतात. अनेकदा हा प्रकार पहायला मिळत असतो. रस्त्यांवरुन वापरणारे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना मोठ्या ञासाचे ठरते. गाड्याच्या हॉर्न वाजवूनही जनावरे रस्त्यावरुन सरकत नाहीत. पायी वापरणाºया नागरिक व महिलांनाही या जनावरांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.