यावलसह बोदवड मुक्ताईनगरात रास्ता रोको
By Admin | Updated: June 5, 2017 13:00 IST2017-06-05T13:00:00+5:302017-06-05T13:00:00+5:30
शेतक:यांना सरसकट कजर्माफी द्यावी या मागणीसाठी यावलसह मुक्ताईनगरात शिवसेनेतर्फे तर बोदवडला शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला़

यावलसह बोदवड मुक्ताईनगरात रास्ता रोको
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जि़ जळगाव,दि.5- शेतक:यांना सरसकट कजर्माफी द्यावी या मागणीसाठी यावलसह मुक्ताईनगरात शिवसेनेतर्फे तर बोदवडला शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला़
यावलला कार्यकत्र्याना अटक
कजर्माफीसह वीज बिल माफी, केळीला फळाचा दर्जा या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने भुसावळ टी पॉईंट सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता रास्ता रोको करण्यात आला़ आंदोलनामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प झाली़ तालुकाप्रमुख कडू पाटील, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे, शरद कोळी, संतोष धोबी, मुन्ना पाटील यांच्यासह कार्यकत्र्यानी रास्ता रोको केला़ कार्यकत्र्याना अटक करून नंतर सुटका करण्यात आली़
बोदवडला शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको
बोदवड येथील मलकापूर चौफुलीवर सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला़ शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम पाटील, नाना पाटील, बाळू पाटील, जिल्हाध्यक्ष एकनाथ शेळके यांच्या नेतृत्वात शेतक:यांनी रास्ता रोको आंदोलन झाल़े नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े
मुक्ताईनगरात रास्ता रोको
शिवसेनेतर्फे सोमवार, 5 रोजी दुपारी 12़30 वाजता वाजता मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात रास्ता रोको करण्यात आला़ शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, विठ्ठल तळेले, प्रवीण चौधरी, राजेंद्र तळेले, आकाश सापधरे, शुभम तळेले, संतोष कोळी व शिवसैनिक प्रसंगी उपस्थित होत़े रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली़