रावेरला रिपाइंतर्फे घरकुलांसाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 17:43 IST2019-12-14T17:43:11+5:302019-12-14T17:43:16+5:30
विविध मागण्यांचे निवेदन सादर

रावेरला रिपाइंतर्फे घरकुलांसाठी रास्ता रोको
रावेर : बेघर असलेल्यांंना घरकुल द्यावे यासाह इतर मागण्यांसाठी रिपाइं आठवले गटातर्फे बºहाणपूर राज्यमहामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, तालूकाध्यक्ष विक्की तायडे, एकनाथ गाढे, कमलाकर गाढे आदींसह १५० कार्यकर्त्यांनी बेघरांना घरकूल मिळालेच पाहिजे, रहिवाशांचे अतिक्रमण कायम केलेच पाहिजे, स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी झालीच पाहिजे, रावेर शहरातील अतिक्रमण काढावे आदी मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी रावेर नायब तहसीलदार पवार यांनी भेट देऊन निवेदन स्विकारले. यावेळी एकनाथ गाढे, कमलाकर गाढे, सतीश निकम, धोनी तायडे, नरेंद्र तायडे, राहुल आदिवाल, किरण ढिवरे, चांगो भालेराव व कार्यकर्ते उपस्थित होते.