निंभोरा रेल्वेस्थानकावर ‘अमृतसर’चा थांबा कायम ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:32+5:302021-06-19T04:11:32+5:30

निंभोरा बुद्रुक, ता.रावेर : दादर-अमृतसर एक्सप्रेसचा येथील थांबा पुन्हा सुरू करून तो कायम ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...

The stop of 'Amritsar' should be maintained at Nimbhora railway station | निंभोरा रेल्वेस्थानकावर ‘अमृतसर’चा थांबा कायम ठेवावा

निंभोरा रेल्वेस्थानकावर ‘अमृतसर’चा थांबा कायम ठेवावा

निंभोरा बुद्रुक, ता.रावेर : दादर-अमृतसर एक्सप्रेसचा येथील थांबा पुन्हा सुरू करून तो कायम ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी खासदार रक्षा खडसे यांना दिले आहे.

निंभोरा हे गाव रावेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले गाव आहे. पंचक्रोषीतील नागरिकांची निंभोरा येथे खूपच वर्दळ असते. तसेच निंभोरा हे गाव रेल्वे स्टेशनचे निंभोरा म्हणून प्रसिद्ध आहे. रेल्वे स्थानकावर दादर अमृतसर (पठाणकोट) या एक्सप्रेसचा थांबा पूर्वीपासून आहे. या थांब्यामुळे निंभोरासह परिसरातील नागरिकांची प्रवासाची मोठी सोय होते. तरी नेहमीप्रमाणे थांबा कायम राहावा यासाठी रेल्वे अधिकारी यांच्याशी चर्चा केली असून काही दिवसांनी नेहमीप्रमाणे हा थांबा सुरू होईल, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी निवेदनकर्त्यांना दिली.

दुर्गादास पाटील, सरपंच सचिन महाले, पत्रकार राजीव बोरसे, सुनील कोंडे, प्रा.दिलीप सोनवणे, दस्तगीर खाटीक, आशिष बोरसे, संदीप कोळी, किरण सपकाळे, राजू गुरव, तसेच मधुकर बिऱ्हाडे सर, ग्रा.पं. सदस्य दिलशाद शेख, रवींद्र महाले, राहुल सोनार, वेदांत पाटील, ग्रा.पं.स अमोल खाचणे, स्वप्नील जावळे, अकिल खाटीक, युनून मिस्तरी, गुलाब पिंजारी आदींनी निवेदन दिले.

Web Title: The stop of 'Amritsar' should be maintained at Nimbhora railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.