दगडी पूल तीन महिन्यांसाठी बंद

By Admin | Updated: November 24, 2015 00:56 IST2015-11-24T00:56:54+5:302015-11-24T00:56:54+5:30

भुसावळ- जळगाव दरम्यान तिस:या रेल्वे लाईनसाठी प्रत्यक्षात कामाला सोमवारपासून प्रारंभ झाला.

Stony pool closed for three months | दगडी पूल तीन महिन्यांसाठी बंद

दगडी पूल तीन महिन्यांसाठी बंद

भुसावळ : भुसावळ- जळगाव दरम्यान तिस:या रेल्वे लाईनसाठी प्रत्यक्षात कामाला सोमवारपासून प्रारंभ झाला. दगडी पूल तीन महिने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आह़े रेल्वेने वाहनधारकांची गैरसोय टळण्यासाठी पर्यायी मार्ग खुला केल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली आह़े

जळगाव-भुसावळदरम्यान तिसरी रेल्वे लाईन अंथरली जात असून बहुतांश ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. शहरातील रेल्वे दगडी पुलावर रेल्वे लाईन अंथरण्यासाठी पालिकेची परवानगी, तसेच पर्यायी रस्त्याच्या मागणीमुळे तब्बल दोन ते तीन महिने काम संथगतीने सुरू होत़े रेल्वे प्रशासनाने पर्यायी बोगद्याच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्षात सोमवारपासून कामाला सुरुवात केली आह़े

दगडी पूल तीन महिन्यांसाठी बंद

रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिका:यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली़ जेसीबी यंत्राद्वारे नाल्यांचे खोलीकरण, पाण्याच्या पर्यायी व्यवस्थेसाठी बोअरिंग, तसेच अन्य कामांना सुरुवात करण्यात आली़ या भागातून वाहतूक बंद करण्यात आल्यासंदर्भात बॅरिकेटस् लावण्यात आले आहेत़

जड वाहनांचा मार्ग बदलला

दगडी पूल बंद झाल्यामुळे यावलसह रावेरकडे जाणा:या शहरातील बससह ट्रक आदी वाहनांची वाहतूक नाहाटा चौफुली, नवोदय विद्यालय, वाय पॉईंटमार्गे गांधी पुतळ्याकडून वळवण्यात आली आह़े बसचे अंतर वाढल्याने एक टप्पा भाडे वाढविण्यात आले आह़े यावल शहरासाठी आता 24 रुपयांऐवजी 30 रुपये मोजावे लागणार आहेत़

रेल्वे पुलाखाली गर्दी

दगडी पूल बंद झाल्याने रेल्वे लोखंडी पुलाखाली वाहनधारकांची मोठी गर्दी झाली़ वाहतूक शाखेतर्फे तीन पोलिसांची वाहतुकीची कोंडी न होण्यासाठी नियुक्ती करण्यात आली़ शाळा सुरू झाल्याने कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षावजा मागणी त्रस्त वाहनधारकांकडून होत आह़े

Web Title: Stony pool closed for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.