मनपा कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST2021-06-25T04:14:03+5:302021-06-25T04:14:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महिलेची छेडखानी होत असल्याच्या गैरसमजुतीतून दोन मद्यपींनी प्रभाकर तुळशीराम महाजन (वय ५५, रा. मेहरूण) ...

मनपा कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महिलेची छेडखानी होत असल्याच्या गैरसमजुतीतून दोन मद्यपींनी प्रभाकर तुळशीराम महाजन (वय ५५, रा. मेहरूण) यांना नशेत डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीला आली आहे. महाजन हे महानगरपालिकेच्या घंटागाडीवरील कर्मचारी आहेत.
गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जे.के. पार्क या ठिकाणी त्यांचे नात्यातील एका महिलेशी वाद सुरू होता. दरम्यान, त्याच ठिकाणी अनोळखी दोन व्यक्ती यांना महिलेची छेडखानी होत असल्याचा गैरसमज झाला. त्यानी प्रभाकर महाजन यांना काहीही न विचारता शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. यात झटापटीत एकाने त्यांच्या डोक्यात दगड टाकला. त्यात ते जखमी झाले. हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही अनोळखी घटनास्थळाहून फरार झाले होते. जखमी अवस्थेत प्रभाकर महाजन यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी जखमीची भेट घेऊन विचारपूस केली होती.