हॉटेल व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून
By Admin | Updated: October 1, 2015 00:01 IST2015-10-01T00:01:27+5:302015-10-01T00:01:27+5:30
नवापूर : कोठडा शिवारातील नवरंग हॉटेलच्या संचालकाचा बुधवारी पहाटे दगडाने ठेचून खून करण्यात आला.

हॉटेल व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून
नवापूर : शहरालगत कोठडा शिवारातील रेल्वे फाटक परिसरात असलेल्या नवरंग हॉटेलच्या संचालकाचा बुधवारी पहाटे दगडाने ठेचून खून करण्यात आला. खुनाचे कारण समजू शकले नसले तरी तपासकामी पोलिसांनी हॉटेलच्या दोन कर्मचा:यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांनुसार, शहरालगत असलेल्या कोठडा शिवारातील रेल्वे फाटक परिसरात नवरंग हॉटेल आहे. या हॉटेलचे संचालक मोहनसिंग कमलसिंग राजपूत (वय 50, रा. पांडेसरा, सुरत, गुजरात) हे रात्री हॉटेलमध्ये झोपलेले होते. पहाटे पाच वाजेपूर्वी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या डोक्यात मोठा दगड टाकला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली. या हॉटेलचे भागीदार संचालक उमाशंकर प्रजापती यांनी नवापूर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण समजू शकले नाही. अपर पोलीस अधीक्षक अनिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत यांनी घटनास्थळी भेट दिली. फौजदार रमेश वराडे, हवालदार खांडेकर तपास करीत आहेत. (वार्ताहर)