कजगावजवळ चोरटय़ांकडून वाहनांवर दगडफेक
By Admin | Updated: June 12, 2017 15:50 IST2017-06-12T15:50:43+5:302017-06-12T15:50:43+5:30
पाच ते सहा वाहनांचे नुकसान

कजगावजवळ चोरटय़ांकडून वाहनांवर दगडफेक
ऑनलाईन लोकमत
कजगाव ता.भडगाव,दि.12 - अज्ञात चोरटय़ांनी दगडफेक करीत 5 ते 6 वाहनांचे नुकसान केले. यात औरंगाबाद येथील सायली आशुतोष दंडगव्हाळ या मुलीच्या डोक्यास मोठा दगड लागल्याने तिला चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना 11 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडली.
कजगाव- चाळीसगाव मार्गावरील उमरखेड फाटय़ावर रस्तालुटीच्या उद्देशाने रस्त्याच्या दुतर्फा दबा धरून बसलेल्या चोरटय़ांनी वाहनांवर बेछूट दगडफेकीस सुरुवात केली. यात काही गाडय़ांच्या काचा फुटल्या. याच दरम्यान कजगाव येथील बांधकाम ठेकेदार विनायक रमेश कुमावत हे आपल्या चारचाकी वाहनाने कजगाव कडे येत असताना त्यांच्या वाहनावर देखील दगडफेक सुरू झाली. मात्र प्रसंगावधान राखत कुमावत यांनी सरळ दगडफेक करणा:या अज्ञात चोरटय़ांच्या दिशेने आपले वाहन नेले. यात त्यांच्या वाहनाची दगडफेकीमुळे काच फुटली. चोरटय़ांनी दगडफेक सुरुच ठेवली. त्यात औरंगाबाद येथून कजगाव येथे र}ाकर सोनार यांचे कडे लग्नासाठी येत असलेले आशुतोष दंडगव्हाळ यांच्या वाहनांवर देखील दगडफेक सुरू झाली. यात गाडीचा काच फुटून आत आलेल्या मोठय़ा दगडामुळे सायली या मुलीचे डोके फुटल्याने तिला चाळीसगाव येथे नेण्यात आले. डोक्यास मार लागल्याने टाके घेण्यात आली