शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयाचा कारभारी आज ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 11:59 IST

भाजप की ‘महाविकास’: अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची उत्सुकता शिगेला, अनेक नावे चर्चेत

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीचा सस्पेंस शुक्रवारी दुपारी संपणार आहे़ भाजपा व महाविकास आघाडीकडून होणाऱ्या दाव्या, प्रतिदाव्यांनी या निवडीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे़ काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य भाजपच्या गळाला लागले असून त्यांची संख्या ३८ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे़ गुरूवारी रात्री उशिरा भाजपचे सर्व सदस्य जळगावात पोहचणार होते़जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला होता. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेतही त्या हालचाली गतिमान झालेल्या होत्या़ मात्र, एक राष्ट्रवादी, एक शिवेसेनेच्या सदस्या अपात्र ठरल्याने महाविकास आघाडीचे गणित फिस्कटले होते़ मात्र, मंत्री गुलाबराव पाटील व आमदार अनिल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झालेल्या होत्या़ त्यामुळे भाजपनेही काळजी घेत त्यांच्या सदस्यांना रविवारपासून सहलीला पाठविले होते़असे असेल गणित़़़़़जळगाव लोकसभा मतदारसंघात उपाध्यक्षपद व एक सभापतीपद तर रावेर लोकसभा मतदारसंघात अध्यक्षपद व तीन सभापती तसेच एक गटनेते अशा पदांची विभागणी माजी आमदार एकनाथराव खडसे यांच्या सोबत झालेल्या बैठकीतच करण्यात आली होती़ शिवाय ज्यांना पदे मिळालेली आहेत, अशांना पुन्हा संधी मिळणार नाहीत, असे खडसे यांनी स्पष्ट केले होते़त्यामुळे रंजना चव्हाण यांच्या नावाला त्याच वेळी बे्रक लागला होता़अध्यक्षपदासाठी पल्लवी सावकारे, रंजना पाटील अथवा नंदा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. आता सामाजिक गणिताचा विचार केल्यास भाजपकडून उपाध्यक्षपदासाठी मधू काटे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.मान मग पल्लवी सावकारे यांना मिळेल, असे संकेत आहे़ कारण रंजना पाटील यांना अध्यक्षपद मिळाल्यास उपाध्यक्षपदासाठी दुसरा उमेदवारा द्यावा लागणार आहे़ असे झाल्यास मधू काटे हे पदापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने पक्ष सध्या ही रिस्क घेणार नाही़ त्यांचा उपाध्यक्ष पदावर दावा मजबूत असल्याने पल्लवी सावकारे यांचा अध्यक्षपदावर मजबूत दावा असणार आहे़जळगाव लोकसभा मतदार संघातील लालचंद पाटील यांना सभापतीपद मिळण्याचे संकेत आहे़त़ दरम्यान, पल्लवी सावकारे यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी सदस्य आग्रही आहेत, सभापती पदासाठी जयपाल बोदडे, रवींद्र पाटील, लालचंद पाटील आदी नावे समोर आलेली आहेत़दोन सदस्यांची जबाबदारीकाँग्रेसच्या दोन सदस्यांना भाजपकडे आणण्याची जबाबदारी भाजपचे एक जळगावातील पदाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे़ तसेच काँग्रेसचे आरोग्य सभापती दिलीप पाटील हे भाजप सोबत असल्याचे वृत्त समोर आले आहे़भापजच्या सर्व सदस्यांचे मोबाईल जमा करण्यात आलेले होते़ केवळ जामनेरच्या एका तरूण सदस्यांचा मोबाईल त्यांच्या जवळ होता़ त्यांच्यावर सर्व सदस्यांवर निगराणीची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती़ सर्व सदस्य त्र्यंबकेश्वर येथे थांबून होते़ गुरूवारी दुपारच्या सुमारास ते जळगावकडे रवाना झाले होते़भाजपच्या दोन सदस्या वेगळयाराष्ट्रवादीच्या अमळनेरच्या एक सदस्या भाजपसोबत सहलीला असल्याने त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून दबाव टाकण्यात येत होता़ त्यांना होणार त्रास बघता भाजपच्या दोन महिला सदस्या व राष्ट्रवादीच्या त्या सदस्या अशा तीन सदस्या भाजपच्या या गोटातून वेगळ्या ठिकाणी निघून गेल्या होत्या़ त्याही वेळेवर जळगावात पोहचतील असे सूत्रांनी सांगितल़ेयांचे असतील अर्ज४भाजपकडून रंजना पाटील व पल्लवी सावकारे, नंदा पाटील तर महाविकास आघाडीकडून जयश्री पाटील यांचे अर्ज राहतील४उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून मधू काटे, लालचंद पाटील तर महाविकास आघाडीकडून नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, प्रताप पाटील यांचे अर्ज असण्याची शक्यता आहे़अशी असेल प्रक्रियासकाळी ११ ते १ वाजेदरम्यान अर्ज स्वीकारले जातील़ त्यानंतर ३ वाजता अर्जांची छाननी करून वैध अर्जांची घोषणा केली जाईल व दहा मिनिटे माघारीसाठी वेळ दिला जाईल़ त्यानंतर अ,ब़, क़, ड नुसार नावांची घोषणा करून त्यावर उजवा हात उंचावून मतदान घेतले जाईल. हात उंचावलेल्या सदस्यांच्या स्वाक्षºया घेतल्या जातील़ त्यानंतर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात येईल, उपाध्यक्ष निवडीसाठीही हीच प्रक्रिया राबविली जाईल. पाच वाजेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल़

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव