एकोपा एक्स्प्रेसचे स्टेअरिंग शिवसेनेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:47+5:302021-09-14T04:20:47+5:30
जामनेर : भाजपचे गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे संजय गरुड यांना दोन्ही बाजूला बसवून एकोपा एक्स्प्रेसचे स्टेअरिंग मात्र शिवसेनेचे डॉ. ...

एकोपा एक्स्प्रेसचे स्टेअरिंग शिवसेनेकडे
जामनेर : भाजपचे गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे संजय गरुड यांना दोन्ही बाजूला बसवून एकोपा एक्स्प्रेसचे स्टेअरिंग मात्र शिवसेनेचे डॉ. मनोहर पाटील यांच्या हातात देऊन त्यांनी दाखविलेली समयसूचकता शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
भविष्यातील तालुक्याच्या राजकारणाचे स्टेअरिंग शिवसेनेच्या हाती असेल, अशी पोस्ट भरत पवार यांनी टाकल्याने तीचीही चर्चा होत आहे. एकीकडे असे गुणगाण सुरू असताना दुसरीकडे दौऱ्यात सहभागी जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहे. एखाद्या कार्यकर्त्याने विरोधक असलेल्या नेत्याची साधी भेट घेतली तरी डोक्याला आटी पाडली जाते व आता यांचा एकोपा चालतो, अशी चर्चा भिन्न पक्षात काम करणारे कार्यकर्ते करीत आहेत.