बस स्थानकावरून महिलेची पर्स चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 21:16 IST2019-08-08T21:13:50+5:302019-08-08T21:16:17+5:30

बोदर्डे, ता.अमळनेर : येथील बस स्थानकावरून बसमध्ये चढत असताना एका महिलेची पर्स चोरीस गेल्याची घटना ८ रोजी दुपारी घडली. ...

Steal a woman's purse from a bus station | बस स्थानकावरून महिलेची पर्स चोरी

बस स्थानकावरून महिलेची पर्स चोरी


बोदर्डे, ता.अमळनेर : येथील बस स्थानकावरून बसमध्ये चढत असताना एका महिलेची पर्स चोरीस गेल्याची घटना ८ रोजी दुपारी घडली.
मुडीबोदर्र्डे येथील महिला गायत्री किशोर चौधरी या अमळनेरहून दुपारी जळगावला जाणासाठी स्थानकावर आल्या. त्यांच्यासोबत एक महिला व लहान मुलगा होता. बसमध्ये चढत असताना त्यांच्या हातातून एका गरोदर महिलेने पर्स ओढून घेतली. ही महिला अर्ध्या तासापासून त्यांच्याभोवती फिरत त्यांना धक्काबुक्की करीत होती. तिला हटकले असता बसमध्ये चढत असताना तिने पर्स ओढली. त्यात महत्त्वाची कागदपत्रे व १ हजार ५०० रुपये होते. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल न करता चौधरी या जळगावकडे निघून गेल्या.
मात्र बस स्थानकावर सोनसाखळी, पाकीट, मंगळसूत्र आदी चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्याकडे स्थानक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

Web Title: Steal a woman's purse from a bus station