शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा परिषदेच्या ब्रिटिशकालीन इमारतीची स्थिती दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:58 IST

पडझडमुळे धोकादायक

ठळक मुद्देनवीन इमारत उभारणे आवश्यकएक प्रकारे अंधार कोठडी

जळगाव : ब्रिटिशकालीन असलेल्या जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. ही इमारत खूपच जुनी असल्याने कोठे किरकोळ पडझड, तर पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती हे प्रकार नेहमीचेच झाले आहे. यामुळे ही इमारत पाडून येथे नव्याने इमारत उभारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.सुमारे शंभरी गाठलेली ही कौलारू इमारत आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज याच इमारतीत होत असे. मात्र ही जागा अपूर्ण पडू लागल्याने १९७६ मध्ये बाजूलाच असलेल्या जागेत नवीन इमारत बांधण्यात आली. आता नवीन आणि जुनी अशा दोन इमारतीत जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू आहे.एक प्रकारे अंधार कोठडीजुन्या पद्धतीचे बांधकाम असून या ठिकाणी काही वाढीव बांधकामही नंतर झालेले दिसून येते. बहुतांश खोल्यांमध्ये अंधार असतो. नेहमीच लाईटची गरज भासते. हवाही खेळती नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना येथे अंधार कोठडीत ठेवल्यासारखेच आहे. जुने बांधकाम असल्याने ते धोकादायकही झाले आहे.काही दिवसांपूर्वीच पडझडजुन्या इमारतीत असलेल्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयात काही दिवसांपूर्वीच पडझड झाली होती. सुदैवाने कोणास इजा पोहचली नव्हती. मात्र मोठी घटना घडण्याची वाट प्रशासनाने पाहू नये, असे कर्मचाºयांमध्ये बोलले जात आहे.२०११ मध्ये तयार झाला होता प्रस्तावविद्यमान आमदार स्मिता वाघ या गेल्या काळात जि.प. अध्यक्ष असताना त्यांनी जुन्या इमारतीचे बीओटी तत्त्वावर बांधकामाचा प्रस्ताव सरकारकडे दिला होता. यात पुढे दुकाने, मध्ये पार्किंग व वर आॅफिसेस यानुसार आराखडा होता. यामुळे जिल्हा परिषदेचे उत्पन्नही वाढले असते. या प्रस्तावास सरकारने मंजुरीही दिली. मात्र टेंडर प्रक्रिया सुरू होण्याच्या आतच मध्येच ‘राजकारण’ आल्याने हा विषय मागे पडला. या बांधकामासह दोन्ही इमारतींना जोडणारा छोटा पूलही प्रस्तावित होता. यामुळे कर्मचाºयांना या इमारतीतून त्या इमारतीत येणे-जाणे सुलभ होणार होते. मात्र सगळेच विषय बाजूला पडले. परंतु आजची गरज लक्षात घेता हे विषय पुन्हा कार्यान्वित होणे गरजेचे आहे.जुन्या इमारतीच्या जागेचा अधिक लाभ घेता येईलजुन्या इमारतीची नेहमीची किरकोळ दुरुस्ती व गळतीचा त्रास लक्षात घेता या ठिकाणी नवीन इमारत बांधणेच योग्य ठरणार आहे. आता बहुतांश सदस्यांकडे चारचाकी वाहने आहेत. यामुळे नेहमीच ही वाहने रस्त्यावर लागलेली असतात. याचा त्रास वाहतुकीस होतो. सर्वसाधारण सभेच्या वेळी तर वाहनांची खूपच गर्दी होते. यामुळे या जागेवर खाली पार्किंग व वर आॅफिसेस असे बांधकाम झाल्यास अधिकच सोयीचे होईल.जि.प. अध्यक्षांचे निवासस्थानही जीर्णजिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थानही जीर्ण झाले असून त्याचीही दुर्दशा झाली आहे. पुढे असलेल्या विस्तारित बांधकामाचा काही दिवसांपूर्वीच स्लॅबचा भाग कोसळला. जागोजागी गळती त्यास लागली आहे. यामुळे या ठिकाणीही नवीन इमारत उभारणे गरजेचे आहे. मात्र नवीन इमारत उभारण्याचा विषय निश्चित नसला तरी दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव