चाळीसगावला रविवारी होणार शिवरायांच्या पुतळ्याचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:19+5:302021-09-24T04:19:19+5:30
चाळीसगाव शहरात वाहतूक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जावा, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून प्रयत्न केले जात ...

चाळीसगावला रविवारी होणार शिवरायांच्या पुतळ्याचे आगमन
चाळीसगाव शहरात वाहतूक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जावा, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. मध्यंतरी जागेचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर पुतळा व शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला. अश्वारूढ पुतळा तयार झाला झाला आहे. २६ रोजी हा पुतळा सन्मानपूर्वक शहरात आणला जाणार असून, यानंतर त्याचे लोकार्पण होईल. यासाठी गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय व संघटनांची बैठक बोलावून त्यांच्या सूचना व मते जाणून घेण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्षा आशालता चव्हाण, गटनेते संजय रतनसिंग पाटील, शहर विकास आघाडीचे उपनेते सुरेश स्वार, भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण, वसंत चंद्रात्रे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, सूर्यकांत ठाकूर, दीपक पाटील, मानसिंग राजपूत, चिराग शेख, विजया पवार, अरुण अहिरे, चंद्रकांत तायडे, भगवान पाटील, चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्रमंडळाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, सचिव एम. बी. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, माजी नगरसेवक शाम देशमुख, बाळासाहेब मोरे, सोमसिंग राजपूत, नितीन पाटील, लक्ष्मण शिरसाट, धर्मभूषण बागुल, गणेश पवार, दिलीप घोरपडे, वर्धमान धाडिवाल, भूषण ब्राह्मणकर, सुधीर पाटील, खुशाल पाटील, आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात घृष्णेश्वर पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. यासाठी एक कोअर कमिटीही स्थापन करण्यात येऊन कोरोनाचे सर्व नियम पाळून हा सोहळा पार पाडण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
चौकट
शिवनेरी फाउंडेशन करणार पुष्पवृष्टी
पिलखोड ते बायपास चौफुलीपर्यंत प्रत्येक गावात शिवरायांच्या पुतळा आगमनाप्रसंगी स्वागत केले जाणार आहे. ढोल-ताशांच्या गजरासह घरोघरी गुढी उभारून हा दिवस संस्मरणीय केला जाणार आहे. बायपास चौफुली ते वाहतूक चौकातील चबुतऱ्यापर्यंत मिरवणूक काढली जाईल. यावेळी या मार्गावर शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यासह रांगोळ्यांची आरास शिवनेरी फाउंडेशनतर्फे प्रतिभा चव्हाण करणार असल्याचे त्यांनी बैठकीतच जाहीर केले.
१. उर्वरित खर्च पालिकेमार्फत करण्यात यावा, अशी सूचना मांडली गेली. यावर प्रशासकीयदृष्ट्या योग्य निर्णय घेऊ, असे नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी सांगितले.
महत्त्वाची चौकट
१४ फूट उंचीचा पुतळा
वाहतूक चौकात ६८० चौ.मी. जागेत शिवसृष्टीही उभारली जात असून यासाठी ६० लाख ३४ हजारांचा निधी मिळाला आहे.
१. शिवाजी महाराजांचा पुतळा हा १४ फूट उंच असून चबुतऱ्यावर त्याचे लोकार्पण होणार आहे. पुतळ्याचे वजन २८०० ते ३००० हजार किलो आहे. पुतळा तयार करण्यासाठी ५८ लाख ५० हजार रुपये खर्च आला आहे. चबुतरा व संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी ७२ लाखांचा निधी मिळाला आहे.
आमदार, खासदारांची अनुपस्थिती
या बैठकीला आमदारांसह खासदार आणि माजी आमदारांची अनुपस्थिती असल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला होता.
230921\23jal_7_23092021_12.jpg
घरोघरी गुढी उभारुन स्वागत : ढोल - ताश्यांचा गजर, रांगोळ्यांची आरास