स्टेशन मास्तरांचे अन्न त्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:16 IST2021-01-22T04:16:07+5:302021-01-22T04:16:07+5:30

जळगाव : रात्रीपाळीच्या भत्यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी विविध ठिकाणच्या स्टेशन मास्तरांनी भुसावळ येथे डीआरएम कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले. यावेळी ...

Station Master's food abandonment movement | स्टेशन मास्तरांचे अन्न त्याग आंदोलन

स्टेशन मास्तरांचे अन्न त्याग आंदोलन

जळगाव : रात्रीपाळीच्या भत्यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी विविध ठिकाणच्या स्टेशन मास्तरांनी भुसावळ येथे डीआरएम कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले. यावेळी विजय पाटील, सुधीर गरूड, सुनील लोहार, डी. एस. झुंजेराव, धीरज शर्मा, रणवत प्रसाद, उपेंद्र कुमार, सीयाराम मिना, विश्वजीत सिंह, गणेश बुंदेले, दीपक कुमार आदी स्टेशन मास्तर सहभागी झाले होते.

वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त जळगाव आगारात व्याख्यान

जळगाव : परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारात वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त गुरुवारी सुरक्षितता मोहीम, रस्ते सुरक्षितता यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांचे व्याख्यान झाले. यावेळी यंत्र अभियंता एस. बी. सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, कामगार अधिकारी प्रशांत महाजन, राहुल शिरसाठ, आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, नीलेश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. डी. सोनार यांनी केले. यशस्वितेसाठी सिद्धार्थ चंदनकर, मनोहर मिस्तरी, बागडे, मयूर बडगुजर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Station Master's food abandonment movement