सीआयडूचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:37+5:302020-12-04T04:46:37+5:30
जळगाव : राज्य शेतमजूर युनियन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनप्रणीत कामगार संघटनांतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ...

सीआयडूचे तहसीलदारांना निवेदन
जळगाव : राज्य शेतमजूर युनियन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनप्रणीत कामगार संघटनांतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, बाजार समित्या व्यापाऱ्यांच्या हवाली करणे बंद करा, कंत्राटी शेती धोरण, सार्वजनिक उद्योगांची विक्री बंद करा यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
निदर्शकांनी तहसील कार्यालयावर केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच तहसीलदारांना निवेदन केले. यावेळी विनोद अढाळके, विजय पवार, अकील खान मणियार, रमेश मिस्त्री, अविनाश चौधरी, प्रवीण चौधरी उपस्थित होते.