राज्य सेपाक टकरा स्पर्धेसाठी राज्य संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST2021-09-17T04:21:24+5:302021-09-17T04:21:24+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशनची वरिष्ठ राज्य सेपाक टकरा स्पर्धा शुक्रवारपासून वर्धा येथे सुरू होत आहे. त्यात ...

राज्य सेपाक टकरा स्पर्धेसाठी राज्य संघ जाहीर
जळगाव : महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशनची वरिष्ठ राज्य सेपाक टकरा स्पर्धा शुक्रवारपासून वर्धा येथे सुरू होत आहे. त्यात जळगाव जिल्हा संघ सहभागी होणार आहे.
या संघात मोहम्मद आमीर (कर्णधार), दीपक जाधव, कौफ खान, सकलेन काझी, समीर तडवी, इम्रान शेख, फैजान शेख, तन्वीर शहा, मुजफ्फर शेख, अक्षय जाधव, जुमेद शेख, अमित तडवी, जुबेर शेख, हसन तडवी यांचा समावेश आहे. तर संघ व्यवस्थापक म्हणून वसीम मिर्झा, आसिफ मिर्झा यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष एजाज मलिक, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, डॉ. प्रदीप तळवेलकर, प्रशांत जगताप, मुख्याध्यापक बाबू शेख, इक्बाल मिर्झा, शहेनाज शेख, आसिफ इक्बाल यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे कौतुक केले आहे.
फोटो कॅप्शन : संघात निवड झालेल्या खेळाडूंसह इक्बाल मिर्झा, प्रशांत जगताप, प्रदीप तळवेलकर, एजाज मलिक, रवींद्र पाटील, बाबू शेख, शहेनाज शेख, आसिफ इक्बाल आणि मान्यवर.