चाळीसगाव येथे आज राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:33 IST2019-01-07T00:31:36+5:302019-01-07T00:33:47+5:30

य.ना.चव्हाण महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे ७ जानेवारी रोजी य.ना.चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.

State Level Intercollegiate Oratory Competition at Chalisgaon today | चाळीसगाव येथे आज राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

चाळीसगाव येथे आज राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

ठळक मुद्देय.ना.चव्हाण स्मृती दिनानिमित्त उपक्रमाचे आयोजनसायंकाळीच होणार पारितोषिक वितरण

चाळीसगाव, जि.जळगाव : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन य.ना.चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त ७ जानेवारी रोजी य.ना.चव्हाण महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे य.ना.चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.
वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राहुल रनाळकर यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मीशंभू पाटील हे उपस्थित राहतील.
संस्थेचे चेअरमन डॉ.एम.बी.पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी ५ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होईल. संस्थेचे सचिव अरुण निकम यांच्या अध्यक्षतेखाली होईल. उद्योगपती मंगेश रमेश चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. माजी प्राचार्य एस.पी.चव्हाण प्रमुख पाहुणे असतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, प्राचार्य साधना बारवकर, उपपाचार्य शेखर देशमुख यांनी केले आहे

Web Title: State Level Intercollegiate Oratory Competition at Chalisgaon today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.