राज्य मुख्याध्यापक महासंघ अध्यक्ष जे. के. पाटील यांचा सांगवी येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:21 IST2021-08-12T04:21:11+5:302021-08-12T04:21:11+5:30

डोंगर कठोरा, ता. यावल : जे. के. पाटील यांची महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगवी ...

State Headmasters Federation President J. K. Patil felicitated at Sangvi | राज्य मुख्याध्यापक महासंघ अध्यक्ष जे. के. पाटील यांचा सांगवी येथे सत्कार

राज्य मुख्याध्यापक महासंघ अध्यक्ष जे. के. पाटील यांचा सांगवी येथे सत्कार

डोंगर कठोरा, ता. यावल : जे. के. पाटील यांची महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगवी बुद्रूक येथील ज्योती विद्यामंदिर व पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालयात तालुक्यातील मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी ग.स.चे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ सदस्य जी. आर. चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष बाळू पाटील, सहसचिव एस. पी. भिरुड, रावेरचे अध्यक्ष ललित चौधरी, ए. आर. धनपाल, सचिव निशा पाटील, मुख्याध्यापक एस.बी. सरोदे, संघाचे सदस्य डी. व्ही. पाटील, एस. बी. बोठे, गिरीश पाटील, अश्पाक शेख, शावखा तडवी, उमाकांत महाजन, टी. डी. चोपडे, एस. बी. सोनवणे, भुसावळ माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष एल.आर. सुपे, संचालक दीपक बारी तसेच तालुका मुख्याध्यापक संघाचे सदस्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात तुकाराम बोरोले यांनी सांगितले की, जे. के. पाटील हे स्वतःच्या कर्तृत्वाने एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले आहे. ते सर्वांसाठी मुख्याध्यापक २४ तास असून, अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. जे. के. पाटील, डी. व्ही. पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा भटकर यांनी, तर आभार गणेश गुरव यांनी मानले. तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यावल तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी व विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: State Headmasters Federation President J. K. Patil felicitated at Sangvi