शिक्षणविरोधी धोरणामुळेच राज्य सरकारने शिक्षकांचे पुरस्कार रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:22 IST2021-09-05T04:22:00+5:302021-09-05T04:22:00+5:30

जळगाव : शाळा प्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेतून शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षकदिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून ...

The state government withheld teachers' awards due to its anti-education policy | शिक्षणविरोधी धोरणामुळेच राज्य सरकारने शिक्षकांचे पुरस्कार रोखले

शिक्षणविरोधी धोरणामुळेच राज्य सरकारने शिक्षकांचे पुरस्कार रोखले

जळगाव : शाळा प्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेतून शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षकदिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून शिक्षकांचीही उपेक्षा केली आहे, असा आरोप भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केला आहे. सलग दोन वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा हट्ट मागे घेऊन शिक्षक पुरस्कारांची प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणीदेखील त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, राज्य शासनातर्फे राज्यातील शिक्षकांना ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणतेही कारण न देता बंद करण्यात आली.

गेल्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले गेले नाहीत, या वर्षी त्यासंबंधीचे कोणतेही परिपत्रकदेखील जारी केले नाही. शिक्षकांनी वारंवार मागणी करूनही सरकारतर्फे निवड समिती किंवा निवड प्रक्रियाही जाहीर करण्यात आली नाही. गेल्या वर्षी पुरस्कारांची निवड न केल्याने जे आदर्श शिक्षक पुरस्कार व त्यापासूनच्या लाभापासून वंचित राहिले, त्यांची निवड करावी व यंदाचे पुरस्कार तातडीने जाहीर करून शिक्षण क्षेत्राचा अपमान थांबवावा, अशी मागणीही या पत्रकात करण्यात आली आहे.

Web Title: The state government withheld teachers' awards due to its anti-education policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.