शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वरिष्ठ लेखापालाचा स्टेट बॅँकेतच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 16:09 IST

जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील स्टेट बॅँकेत वरिष्ठ लेखापाल असलेले दीपक लक्ष्मण कुळकर्णी (वय ५७, रा.चंदू अण्णानगर, जळगाव ) यांचा गुरुवारी दुपारी चार वाजता बॅँकेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दीपक कुळकर्णी यांची गेल्या आठ दिवसांपासून प्रकृती ...

ठळक मुद्देस्टेट बँकेच्या कानळदा शाखेतील घटनाऔरंगाबाद येथील प्रशिक्षणाचा झाला त्रासतालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील स्टेट बॅँकेत वरिष्ठ लेखापाल असलेले दीपक लक्ष्मण कुळकर्णी (वय ५७, रा.चंदू अण्णानगर, जळगाव) यांचा गुरुवारी दुपारी चार वाजता बॅँकेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दीपक कुळकर्णी यांची गेल्या आठ दिवसांपासून प्रकृती बिघडलेली होती, तरीही अशा परिस्थितीत त्यांना औरंगाबाद येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. तेथून परत आल्यानंतर गुरुवारी बॅँकेत त्यांचा कामाचा पहिलाच दिवस होता.दुपारी तीन वाजता जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने त्यांना घाम आला. त्यानंतर चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बॅँकेतील सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जळगाव शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी कुळकर्णी यांना मृत घोषित केले.कुळकर्णी यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर स्टेट बॅँकेच्या अन्य शाखेतील अधिकारी व कर्मचाºयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. कुळकर्णी यांच्या पत्नी व मुलगीही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले, मात्र त्यांना कुळकर्णी यांच्या मृत्यूची माहिती उशिरापर्यंत देण्यात आली नव्हती. त्यांच्या पश्चात पत्नी छाया, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. एक मुलगी विवाहित आहे तर मुलगा अक्षय हा पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू