शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अप-डाऊन करणार्‍यांसाठी रेल्वे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 19:21 IST

मुंबईतील लोकलसेवेच्या धर्तीवर निर्णय घ्या; रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कासार यांची मागणी

जळगाव । कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांसाठी बंद झालेली रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करावी, त्यासाठी मुंबईतील लोकलसेवेच्या धर्तीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत (संदीप) कासार यांनी भुसावळ मंडळ वाणिज्य प्रबंधक यांच्याकडे केली आहे.देशात लॉकडाऊन लागू होईपर्यंत अप-डाऊन करणारे प्रवासी हे मोठ्या संख्येने रेल्वेवर अवलंबून होते. अप लाईनवरील पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, पाळधी, धरणगाव, अमळनेर, नंदूरबार तर डाऊन लाईनवरील भुसावळ, खंडवा, इटारसी, तसेच मलकापूर, शेगाव, अमरावती या रेल्वे स्थानकांपर्यंत प्रवाशांची दैनंदिन ये-जा होती. परंतु, लॉकडाऊन झाल्यानंतर या सर्वांना रेल्वेला पर्यायी व्यवस्था म्हणून स्वतःच्या दुचाकीने प्रवास करावा लागत आहे. हा प्रकार अत्यंत वेळखाऊ, शारीरिक व मानसिक दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. शिवाय या प्रवासातून आरोग्याच्या समस्याही निर्माण होत असल्याकडे रेल्वे प्रवाशांच्या संघटनेनेही लक्ष वेधले आहे.रेल्वे सुरू करून दिवाळी भेट द्यामुंबईमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला व इतर वर्गासाठी टप्प्याटप्प्याने लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर भुसावळ मंडळात रेल्वेने अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांसाठी तातडीने रेल्वे सेवा सुरू करून दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी चंद्रकांत (संदीप) कासार यांनी केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव